#निल वाणी
काय योग्य काय अयोग्य, कोण खरं कोण खोटे, काय चांगले काय वाईट, कोणता न्याय कोणता अन्याय हे आपल्याला प्रत्येकवेळी गोंधळात टाकतीलच असे नसते पण परिस्थिती अशी असते कि सगळे कळत असताना पण आणि जाणीव असताना पण, आपल्याकडून त्यापैकी एकाची निवड होत नाही. करू शकत नाही अस नाही. पण काही वेळा निवड नियतीवरच सोडलेली किंवा न केलेलीच बरी असते.
आपला संघर्ष हा आपलाच जरी असतो तरी तो आपल्यासाठीच असतो असं नाही. आपल्यासाठीच करायचा यापेक्षा पण प्रबळ प्रेरणा दुसर्या गोष्टीतून भेटू शकते. जेव्हा एखाद कार्य किंवा अभ्यास हा दुसऱ्याशी संबंधित असतो किंवा दुसऱ्यासाठी असतो तेव्हा ते करण अनिवार्य असते म्हणजे केलेच पाहिजे. कारण तुम्हाला दुसर्याच्या अपेक्षा आणि विश्वास तोडायचा अधिकार नाही. तुम्हाला स्वतःकडून अपेक्षा असणे आणी दुसर्यांना तुमच्याकडून असणे यात फरक आहे.
आपल्याला समाजाचे देणे असते असे म्हणतात, पण किमान आपण आपले हितचिंतक जे आहेत त्यांच तर देण फेडायला हव. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची जेव्हा तुम्ही यशाच्या मार्गावर असता तेव्हा त्या मार्गावर मी नाही तर आम्ही असतो. तुम्ही एकटे सगळ साध्य नाही करू शकत, त्यामागे कोणाची तरी प्रार्थना, आधार असतो. अशा व्यक्तींना कधीच गमावायचे नाही(न कळत ही नाही)त्यांना जपून ठेवायचे.

Comments
Post a Comment